top of page


सशक्त शेतीसाठी एक कृतीशील उपक्रम
किसान जागर हा शेतीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनजागृती निर्माण करण्यासाठी
सुरू केलेला एक विशेष उपक्रम आहे. शेतीतील प्रगती, बदल आणि शाश्वतता
या तिन्ही गोष्टींना बळ देण्याच्या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
जागरच्या निमित्ताने शेतीशी संबंधित घटकांना एकत्र आणण्याचा किसानचा
प्रयत्न आहे. ज्यायोगे प्रत्यक्ष शेतीत भेडसावणाऱ्या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी
परस्पर सहकार्य साधता येईल. विविध संस्था, स्वयंसेवी संघटना, शैक्षणिक संस्था
आणि शासकीय यंत्रणा यांना एकत्र आणून, माहिती, साधने आणि संसाधने यांची देवाणघेवाण होईल.
bottom of page



